Home Breaking News ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा …!

ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा …!

● भीम टायगर सेनेची जय्यत तयारी

C1 20250330 15234766

भीम टायगर सेनेची जय्यत तयारी

Wani News | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून यावर्षी भव्यदिव्य ऐतिहासिक अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा केवळ एक सांस्कृतिक वा सामाजिक कार्यक्रम नसून बाबासाहेबांच्या विचारसरणीला समर्पित असलेली एक उर्जा असणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीम टायगर सेना जय्यत तयारी करत असून ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Bhim Tiger Sena is gearing up for the success of the event

13 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता भीमगीतांचा कार्यक्रम आणि उल्लेखनीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार तसेच 13 एप्रिलच्या मध्यरात्री 11:59 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे तर भव्य केक कापून महामानवाला अभिवादन करण्यात येईल. यावेळी आसमंत “जय भीम” आणि “डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर राहो” या घोषणांनी दणाणून जाणार आहे. मध्यरात्री होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याला शहरातील तरुणाईसह नागरिकांनी प्रचंड उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

14 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सर्वांसाठी ‘धम्मभोजन’ आयोजित करण्यात आले असून, समता, बंधुता आणि सामाजिक सलोखा यांचे दर्शन घडवणारा हा प्रसंग असेल. बाबासाहेबांनी दिलेल्या “जगणे आणि जगू देणे” या तत्त्वज्ञानानुसार शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन एकोप्याने भोजनाचा आनंद घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे. सायंकाळी 6:30 वाजता वणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विविध भागांतून निघालेल्या रॅलीचे भव्य स्वागत होणार आहे. यावेळी चौकात हजारोंच्या संख्येने भीमसैनिकांचा जनसागर उसळणार असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि गगनभेदी घोषणा देत भीम अनुयायी एकत्र येणार आहेत. रॅलीचे स्वागत आणि सहभागींचा यथोचित सत्कार करून हा सोहळा जनसामान्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Img 20250103 Wa0009

आयोजित ऐतिहासिक सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश रायपुरे, जिल्हा संघटक आनंदकुमार शेंडे आणि तालुकाध्यक्ष राज घायवन यांच्या नेतृत्वात भीम टायगर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरांतील भीमसैनिक प्रयत्नशील आहेत. समतेच्या आणि बंधुभावाच्या तत्वांना अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Rokhthok News