
● 9 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
● पोलिसांच्या निशाण्यावर ‘ते’ ड्रग्ज शौकिन
Rokhthok wani | तालुक्यातील ड्रग्ज शौकिन महागड्या एमडी (Synthetic Drugs) ची नशा करतात हे शिरपूर पोलिसांच्या धडक कारवाईने सिद्ध झाले आहे. वणी–शिरपूर मार्गावर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात ड्रग तस्कर अलगद अडकला. त्याचे जवळून ‘एमडी’ (मेफेड्रोन) या घातक ड्रगसह तब्बल 9 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद करण्यात आले आहे. Drugs Crime: Who are the ‘white collars’…!
श्रेयस उर्फ गुड्डू शशिकांत पाटील (24) असे अटकेतील आरोपी तरुणाचे नाव आहे. तो पुनवट येथील रहिवासी असून सध्या नागपूर येथे वास्तव्यास आहे. ठाणेदार संतोष मनवर यांना बुधवारी सायंकाळी ‘ड्रग पेडलर’ माल घेऊन वणी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. तात्काळ विशेष पथक तयार करण्यात आले. चारगाव चौकी ते वणी रस्त्यावरील शेताजवळ सायंकाळी सापळा रचला.

संशयित वाहन क्रमांक MH 32 AH 4126 दृष्टीपथास पडताच पोलिसांनी वाहनाची झडती घेतली. आरोपीच्या जिन्स पॅन्टच्या खिशात व कारमधील ड्रॉवरमध्ये तीन प्लास्टिक पाउचमध्ये पांढऱ्या-पिवळसर रंगाचे संशयास्पद पावडर आढळून आले. चौकशीत हा एमडी (मेफेड्रोन) (Synthetic Drugs) असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीने एमडी (मेफेड्रोन) ड्रग नागपूर येथील एका तस्करांकडून आणल्याचे व वणीतील एका पेडलरला देणार असल्याचे कबूल केले आहे. मात्र तो पेडलर नेमका हा माल कोणाला देणार होता हे तपासातून स्पष्ट होणार आहे. एमडी सारख्या सिंथेटिक ड्रग्सचा तरुणांमध्ये वाढता वापर चिंतेचा विषय असून तरुणाई नशेच्या विळख्यात अडकल्या जात आहे. या महागड्या ड्रगचे शौकिन शहरातील व्हाईट कॉलर व्यक्ती असल्याचे बोलल्या जात आहे. त्यांच्यापर्यंत पोलीस पोहचणार का ? हाच संशोधनाचा विषय आहे.
शिरपूर पोलिसांच्या धडक कारवाईत आरोपीला रंगेहाथ पकडत सुमारे 57.1 ग्रॅम MD (मेफेड्रोन) हे सिंथेटिक ड्रग्स जप्त करण्यात आले. याची किंमत सुमारे 5 लाख 60 हजार रुपये आहे. तसेच पंधरा हजार रुपयांचे 3 डिजिटल वजनकाटे, 70 हजार रुपयांचे मोबाईल व ड्रग्स वाहतुकीसाठी वापरलेली कार 4 लाख रुपये असा एकूण नऊ लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला आहे.
सदर डॅशिंग कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI धिरज गुल्हाणे, सुरज साबळे, इक्बाल शेख, प्रशांत झोड, पंकज कुडमेथे, परमेश्वर दराडे, किरण दासरवार, सुनील दुबे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
Rokhthok






