Home क्राईम क्षुल्लक वाद … डोक्यात हाणला बांबूचा फटका

क्षुल्लक वाद … डोक्यात हाणला बांबूचा फटका

● लग्न कार्यक्रमाच्या वादातून मारहाण, गुन्हा दाखल

C1 20260508

लग्न कार्यक्रमाच्या वादातून मारहाण, गुन्हा दाखल

ROKHTHOK | मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे लग्नकार्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जुन्या वादातून एका व्यक्तीवर बांबूने मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. A trivial dispute… hit in the head with a bamboo stick

पोलीस सूत्रांनुसार, फिर्यादी बाबाराम रामेश्वर सोयाम (60) हे मार्डी येथील निवासी असून शेतमजुरीचे काम करतात. दिनांक 7 मे रोजी सकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास पुतणीच्या लग्नकार्यामुळे पाहुण्यांना बोलावण्यासाठी ते आपल्या भावाच्या घरी जात होते. त्यावेळी आरोपी संतोष नथ्थुजी सोयाम (47), राहणार मार्डी याने त्यांना अडवून मुलाच्या लग्नावेळी शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद घातला.

यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आरोपीने घरातून येळवाची काठी आणून बाबाराम सोयाम यांच्या कपाळावर व डोक्यावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या मारहाणीत त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. आरडाओरडा ऐकून उपस्थितांनी घटनास्थळी धाव घेत दोघांमधील भांडण सोडवले.

Img 20250103 Wa0009

या प्रकरणी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके, पो. शी. सागर दीपेवार करताहेत.

    Previous articleधक्कादायक…अंगणवाडी सेविकेचा विनयभंग.!
    Rokhthok News
    वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.