Home राजकीय आशा सेविकांचा सन्मान, महिलांसाठी भव्य भजन स्पर्धा

आशा सेविकांचा सन्मान, महिलांसाठी भव्य भजन स्पर्धा

● मनसे वर्धापन दिनानिमित्त आयोजन

C1 20260308

● मनसे वर्धापन दिनानिमित्त आयोजन

Rokhthok | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचे तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवारी आशा सेविकांचा सन्मान व महिलांसाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून शहरातील शेतकरी मंदिर हॉल येथे दुपारी 12 वाजता कार्यक्रम पार पडणार आहे. Honoring Asha workers, grand bhajan competition for women

C1 20260308

ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या वणी विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यांतील आशा सेविकांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच परंपरेचा भाग म्हणून यंदाही महिला सन्मान सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजित कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 11 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 7 हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 5 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

Img 20250103 Wa0009

मनसेचे विदर्भातील प्रमुख नेते म्हणून ओळख असलेले राजू उंबरकर यांनी पक्ष स्थापनेपासून विदर्भात संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असतात. नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इतिहासकालीन गड किल्ल्याचा भव्य देखावा निर्माण केला होता. त्यावेळी अद्भुत, अविस्मरणीय रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, तरुणाईचा उत्साह व शिवप्रेमींच्या जयघोषाने आसमंत दणाणून गेला होता.

आयोजित स्पर्धेमुळे महिलांमधील सांस्कृतिक प्रतिभेला व्यासपीठ मिळणार असून मोठ्या संख्येने महिला भजन मंडळे सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. सदर भजन स्पर्धेत अधिकाधिक महिला भजन मंडळांनी सहभागी व्हावे,असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्षा अल्का टेकाम त्रिंबके, माजी नगराध्यक्ष प्रिया लभाने तसेच महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर यांनी केले आहे. तसेच वणी विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यांतील महिला, मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वणी : बातमीदार

टीप: बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original) आहे. फोटोच्या चांगल्या सादरीकरणासाठी (Presentation) आणि ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे