Home राजकीय धाकधूक, खलबत, उत्साह आणि पदभार

धाकधूक, खलबत, उत्साह आणि पदभार

● उपाध्यक्ष पदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला निश्चित

C1 20260113

उपाध्यक्ष पदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला निश्चित

Political News :
नगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजप गोटात सकाळपासूनच उत्साह, धाकधूक आणि राजकीय हालचालींना वेग आला होता. भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चव्हाण, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये स्वीकृत सदस्य आणि उपाध्यक्ष पदाबाबत सखोल खलबत झाली. अखेर मार्ग निघाला व पदभार सोहळा उत्साहात संपन्न झाला. Two and a half years formula for the post of Vice President

सकाळी 9 वाजता माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी कुलस्वामिनी जैताई मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर हा ताफा विश्रामगृहाकडे रवाना झाला. स्वीकृत सदस्य आणि उपाध्यक्ष पदाबाबत सखोल खलबत झाली. चर्चेनंतर उपाध्यक्ष पदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. पहिल्या अडीच वर्षांसाठी राकेश बुग्गेवार तर उर्वरित अडीच वर्षांसाठी लक्ष्मण उरकुडे उपाध्यक्ष राहतील, असा निर्विवाद निर्णय झाला.

दरम्यान, नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्या खेमराज आत्राम यांनी सोमवारी दुपारी नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. यानंतर नगरपालिकेची विशेष सभा पार पडली. या सभेत राकेश बुग्गेवार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपतर्फे रवि बेलूरकर, किशनलाल खुंगर, तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उबाठा) चे शत्रुघ्न मालेकर यांची निवड जाहीर करण्यात आली.

Img 20250103 Wa0009

नगरपालिकेत भाजपतर्फे भव्य पदभार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चव्हाण, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, शहराध्यक्ष अ‍ॅड. निलेश चौधरी, संजय पिंपलशेंडे, यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

नगराध्यक्ष विद्या आत्राम यांनी अधिकृतरीत्या पदभार स्वीकारल्यानंतर पालिकेची पहिली विशेष सभा पार पडली. या सभेत उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. पालिकेची पहिलीच सभा असल्याने सर्व नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदग्रहण सोहळा भाजपने आयोजित केल्याने कामकाजाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी भाजपने आपली ताकद दाखवत बाजी मारली.

“वणीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे अत्यावश्यक आहे. स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व विकसित वणी घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यातील आदर्श नगरपालिका म्हणून वणीचे नाव उंचावण्याचा प्रयत्न असेल. शहरातील व्यसनाधीनतेकडे वळणारी तरुणाई ही गंभीर समस्या असून, शिक्षण व समुपदेशनाच्या माध्यमातून सुसंस्कृत व सक्षम नवी पिढी घडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार.
विद्या सचिन आत्राम
नगराध्यक्षा, नगर परिषद, वणी
Rokhthok