Home वणी परिसर मुख्य मार्गावर वृक्ष कोसळल्याने उडाली तारांबळ

मुख्य मार्गावर वृक्ष कोसळल्याने उडाली तारांबळ

◆तहसील कार्यालय मार्गावर वाहतूक ठप्प 

वणी :- येथील बस स्थानक कडे जाण्या मार्गावर असलेले झाड कोसळल्याने चांगलीच तारांबळ उडाली असून एका बाजूने मार्ग बंद झाला आहे

वणी परिसरात गेल्या तीन चार दिवसा पासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. कधी ऊन तर कधी पाऊस असे सुरू आहे. वणीत वृक्ष संवर्धन समितीने च्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा अनेक झाडे लावण्यात आली आहे. तहसील कार्यालय समोरील चौकात असलेले झाड रात्री 8 वाजताच्या सुमारास अचानक पणे कोसळले.

शहराचा हा मुख्य मार्ग असून या मार्गावर चांगलीच वर्दळ असते. झाड कोसळक्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. एका बाजूची वाहतूक बंद झाल्याने मात्र वाहतुकीची कोंडी झाली आहे.

Img 20250103 Wa0009