Home Breaking News विद्यार्थ्यांना स्काॕलरशिपच्या पुस्तकांचे वाटप

विद्यार्थ्यांना स्काॕलरशिपच्या पुस्तकांचे वाटप

305

● औचित्य राजमाता जिजाऊ जयंतीचे

रोखठोक | राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून जि. प. उच्च प्राथमिक शाळा राजुर येथील विद्यार्थ्यांना स्काॕलरशिपच्या पुस्तकांचे व खाऊचे वाटप करण्यात आले. ‘एकच ध्येय हात माझा मदतीचा’ या संस्थेच्या वतीने गुरुवार दि. 12 जानेवारीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मागील अनेक वर्षांपासून “एकच ध्येय, हात माझा मदतीचा” ही संस्था विविध सामाजिक व सर्वसमावेशक उपक्रम सातत्याने राबवत असते. महत्वपूर्ण पुस्तकांचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असते.

राजूर कॉलरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी स्काॕलरशिपच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा अर्चना बोदाडकर, उपाध्यक्ष मिनाक्षी देरकर, सचिव वंदना आवारी, संचालीका ज्योती सुर, संध्या बोबडे, संगिता खाडे, कविता चटकी, गितांजली माथनकर, साधना गोहोकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक निरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात बोलताना अर्चना बोदाडकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, ज्ञान देण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ज्ञान हे पुस्तकातुन आणि अनुभवाने मीळत असते, ज्ञान हे एका पिढीकडुन दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत राहते, म्हणूनच पुस्तके वाटपाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न आमची संस्था करत असते असे स्पष्ट केले.

यावेळी शिक्षकवृंद संगिता गारघाटे, स्वप्ना पावडे, माया सिडाम, छाया वागधरकर, प्रियंका वालखेडे यांचेसह विद्यार्थी- विद्यार्थिनी, पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
वणी : बातमीदार

Previous articleरतनलालजी अग्रवाल यांचे निधन
Next articleविष प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.