Home वणी परिसर विदर्भस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत “वैष्णव” अव्वल

विदर्भस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत “वैष्णव” अव्वल

● मास्टर चेस अकॅडमी चे आयोजन

409
C1 20231229 15055013

मास्टर चेस अकॅडमी चे आयोजन

Wani News :- मास्टर चेस अकॅडमी वणी द्वारा आयोजित विदर्भस्तरीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे वणी शहरात शेतकरी भवन येथे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत वैष्णव पवनीकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला . स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आवारी तर उद्घाटक म्हणून संजय खाडे उपस्थित होते. Vidarbha level rapid chess tournament was organized at Shetkari Bhavan in Wani city.

आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद वासेकर, अशोक नागभिडकर, राजेंद्र कोरडे, तसेच ॲड .ढवस, रामदास कांबळे, अशोक सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वणी तालुक्याचे क्रीडा संयोजक जगदीश ठावरी यांनी केले.

स्पर्धेत वणी चंद्रपूर ,गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला या ठिकाणाहून एकूण 172 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे बक्षीस वितरण संजय खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अविनाश ठावरी, प्रशांत गोडे, प्रमोद निकुरे, लक्ष्मण ढेंगळे प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते .

वाघमारे कंट्रक्शन वणी यांचेकडून ट्रॉफी, संजय खाडे व ऍड कुणाल चोरडिया यांच्याकडून रोख पारितोषिके वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बेलेकर यांनी तर आभार प्रदर्शन जगदीश ठावरी यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मास्टर चेस अकॅडमी चे संचालक मारुती कोंडागुर्ले, राकेश बारशेट्टीवार, देवेंद्र, सुधीर लडके, अमन क्षिरसागर यांनी परिश्रम घेतले.
Rokhthok News