Home क्राईम पालिकेची शाळा चोरट्यांच्या निशाण्यावर

पालिकेची शाळा चोरट्यांच्या निशाण्यावर

* तीन प्रोजेक्टर लंपास 

वणी बातमीदार:-बंद असलेल्या घरांवर नजर असलेल्या चोरट्यांनी आता शाळेला आपल्या निशाण्यावर घेतल्याचे दिसत असून दीपक टॉकीज परिसरात असलेल्या नगर पालिकेच्या शाळा क्र 2 मधून चोरट्यांनी तीन प्रोजेक्टर लंपास केले आहे.

सध्या भुरट्या चोरट्यांनी शहराला आपल्या निशाण्यावर घेतल्याचे दिसत आहे. बंद असलेल्या घरांना हे चोरटे टार्गेट करीत आहे. मात्र आता तर यांची नजर चक्क शाळेवर गेली आहे. शाळेचे साहित्य लंपास करण्यात येत आहे.

शहरातील दीपक टॉकीज परिसरात असलेल्या हनुमान मंदिरा लगत नगर परिषदेची शाळा क्रं 2 आहे.मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता पालिकेने दोन वर्षांपूर्वी प्रत्येक शाळेला डिजिटल प्रोजेक्टर दिले होते. या प्रोजेक्टर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. कोरोना मुळे सध्या शाळेत शिक्षण बंद आहे.

Img 20250103 Wa0009

शनिवारी चोरट्यांनी कुलूप तोडून शाळेत प्रवेश केला व वर्ग खोल्यात लावलेले तीन प्रोजेक्टर लंपास केले. सोमवारी शाळेत गेल्यावर शिक्षकांना चोरी झाल्याची माहिती मिळाली याबाबत मुख्याध्यापक यांनी वणी पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Previous articleराणेंच्या वक्तव्याचा निषेध
Next articleविदर्भ राज्यासाठी ”रस्ता रोको जेल भरो”
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.