Home Breaking News शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या

शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या

● प्राचार्या म्हणून होत्या कार्यरत..!

C1 20260128

प्राचार्या म्हणून होत्या कार्यरत..!

Sad News : शहरातील एका महाविद्यालयात प्राचार्या असलेल्या शिक्षिकेने गळफास लावून जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. शिक्षिका चिखलगाव परिसरात वास्तव्यास होत्या. या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे. Teacher commits suicide by hanging

युगंधरा स्वप्नील खरवडे असे दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. त्या आपल्या परिवारासह चिखलगाव परिसरात वास्तव्यास होत्या तर राजकुवर महिला महाविद्यालय वणी येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असल्याचे बोलल्या जात आहे.

IMG 20260511 WA0005

सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान त्यांचे पती घरी परतले, त्यांनी दरवाजा वाजवला मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी घराचा दरवाजा तोडला असता पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. ही वार्ता परिसरात पसरली, पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही, पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok

Img 20250103 Wa0009
Previous articleप्रजासत्ताक दिनी आंतरशालेय नृत्य स्पर्धा
Next articleभरधाव कार डिव्हायडरवर आदळली
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.