Home क्राईम भावावर फावड्याने जीवघेणा हल्ला

भावावर फावड्याने जीवघेणा हल्ला

● गंभीर जखमीला चंद्रपूर येथे हलवले, पोलिसांकडून तपास सुरू.....

C1 20260523
IMG 20260522 WA0013

गंभीर जखमीला चंद्रपूर येथे हलवले, पोलिसांकडून तपास सुरू…..

ROKHTHOK | मारेगाव तालुक्यातील देवाळा येथे शनिवारी सकाळी घडलेल्या कौटुंबिक वादातून एका भावाने दुसऱ्या भावावर फावड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपी सुनिल बाबाराव बावने (30) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. Fatal attack on brother with shovel

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवाळा येथील रहिवासी अनिल बाबाराव बावने (35) याच्यावर त्याचा लहान भाऊ सुनिल बावने याने शनिवारी सकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास राहत्या घरी फावड्याने हल्ला केला. या हल्ल्यात अनिल बावने गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत घरात पडून होता.

IMG 20260511 WA0005

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी रामदास संभाजी बावने (76), रा. केगाव हे देवाळा येथे पोहोचले असता अनिल हा घरातील हॉलमध्ये गंभीर अवस्थेत आढळून आला. दरम्यान, गावातील काही नागरिकांनी आरोपी सुनिल बावने याने दोन वेळा फावड्याने मारहाण केल्याचे सांगितले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Img 20250103 Wa0009

जखमी अनिल बावने याला प्रथम मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

    Previous articleसामाजिक बांधिलकी जपणारा लोकनेता
    Rokhthok News
    वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.