● शिंदोला- तरोडा गट भाजपच्या निशाण्यावर
सुनील पाटील :
वणी तालुक्यातील सर्वाधिक चर्चेचा व मागील टर्म मध्ये शिवसेनेने ताबा मिळवलेला जिल्हापरिषदेचा पुनर्रचनेपूर्वीचा गट शिंदोला राहिलेला आहे. यावेळी भाजपा, शिवसेनेच्या ताब्यातील बालेकिल्ला काबीज करण्याचा येनकेन प्रकारे प्रयत्न करतील. नव्या चेहऱ्याला संधी देत निखाडे विरुद्ध खाडे अशी तुल्यबळ लढत या निवडणुकीत बघायला मिळेल हे निश्चित. This election will see a close contest between Nikhade and Khade.
वणी तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गण आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जिल्हा परिषदेचा एक व पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून असलेल्या राजकीय धुरंधाराच्या स्वप्नांवर विरजण पडले की पुढील रणनीती ठरली हे अवघ्या काही दिवसातच कळणार आहे.

शिंदोला-तरोडा या गटात सर्वसाधारण, शिरपूर-कायर गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वेल्हाळा-नांदेपेरा गटात सर्वसाधारण, राजूर- चिखलगाव मध्ये सर्वसाधारण व वागदरा-घोंसा गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे.
शिंदोला-तरोडा या गटात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे प्रबळ दावेदार आहेत किंबहुना तेच उमेदवार असतील, तसेच त्यांनी आजपर्यंत आपला बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात जाऊ दिला नाही. मात्र भाजप यावेळी विनिंग कार्ड खेळणार असल्याचे दिसत असून सचिन खाडे यांना निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात तुल्यबळ लढती होणार आहे. जिल्ह्यातील अनेक जिल्हापरिषद गटात तुंबळ रणसंग्राम अभिप्रेत आहे. “जो जिता वो बाजीगर” ठरणार असला तरी वणी तालुक्यातील सर्वात रंगतदार लढत शिंदोला-तरोडा या गटातील असणार आहे.
Rokhthok






