Home Breaking News सौर ऊर्जा प्रकल्पातील मजुरांचा संताप टोकाला !

सौर ऊर्जा प्रकल्पातील मजुरांचा संताप टोकाला !

● अन्यथा 16 जुलैला वीजपुरवठा बंद, संजय निखाडे यांचा इशारा, तहसीलदारांकडून अवादा एनर्जीला पत्र...

C1 20260711

● अन्यथा 16 जुलैला वीजपुरवठा बंद, संजय निखाडे यांचा इशारा, तहसीलदारांकडून अवादा एनर्जीला पत्र…

Rokhthok : वणी तालुक्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पातील स्थानिक मजुरांचे अनेक महिन्यांपासून थकीत वेतन न मिळाल्याने प्रकरण चांगलेच तापले आहे. मजुरांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारीनंतर तहसीलदार कार्यालयाने अवादा एनर्जी प्रा. लि. यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, 15 जुलैपर्यंत सर्व मजुरांचे थकीत वेतन अदा न झाल्यास 16 जुलै रोजी सौर ऊर्जा पुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. The anger of the workers in the solar power project is at its peak!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे तहसीलदार कार्यालयाने संबंधित कंपनीला पत्र पाठविले आहे. या पत्रात प्रकल्पात काम करणाऱ्या स्थानिक मजुरांना अनेक दिवसांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे नमूद करण्यात आले आहे. वारंवार मागणी करूनही केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात मजुरांच्या हातात पैसे पडत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तहसीलदारांनी कंपनीला मजुरांच्या थकीत वेतनाबाबत तात्काळ चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे. तसेच निवेदनातील बाबींकडे दुर्लक्ष झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

Img 20250103 Wa0009

दरम्यान, शिवसेनेने प्रशासन व कंपनीला अंतिम मुदत देत 15 जुलैपर्यंत सर्व मजुरांचे पैसे अदा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा 16 जुलै रोजी संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल तसेच सौर विद्युत पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता कंपनी आणि प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Previous articleधारदार तलवारीसह सराईत गुन्हेगार अटकेत
Next articleCrime ..काठीने हल्ला, इसम गंभीर जखमी
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.