● आरोपी पतीला काही तासातचअटक
Crime News :
चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ तालुक्यातील रूई येथे घडली. बुधवार दिनांक 6 ऑगस्ट ला दुपारी दीड वाजता घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Wife murdered with axe over suspicion of character
मृतक महिलेचे नाव मंदा राहुल डोंगरे (40) तर आरोपी पतीचे नाव राहुल श्रीराम डोंगरे (41) असे आहे. ते एका शेतातील बंड्यात वास्तव्यास असून रोजमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचे. आरोपी राहुल सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार वाद घालत होता. घटनेच्या दिवशी वाद चिघळल्याने त्याने घरातच कुऱ्हाडीने पत्नीच्या डोक्यावर वार केला.
जखमी अवस्थेत मंदा डोंगरेला ग्रामीण पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घराबाहेरून दार बंद करून फरार झाला होता. पोलिसांनी काही तासांच्या आत त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामिण ठाण्याचे ठाणेदार सुनील नाईक, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण मानकर, पोलिस उपनिरीक्षक गजानन शेजुळकर व पथकातील खुशाल राठोड, निरज पातूरकर, सचिन पातकमवार, निलेश शिरसाट, रूपेश नेव्हारे, गजानन गोडंबे, सुदर्शन गणवीर, विक्रांत लांडगे यांनी केली.
ROKHTHOK






