Home वणी परिसर Dysp पुजलवार यांची मुख्यालयात बदली

Dysp पुजलवार यांची मुख्यालयात बदली

● गणेश किंद्रे वणीचे नवे SDPO

1410
C1 20240404 14205351

● गणेश किंद्रे वणीचे नवे SDPO

police officers news | वणी उप‍ विभागीय पोलीस अधिकारी म्‍हणुन संजय पुजलवार (sanjay pujalwar) यांनी यशस्‍वीरित्‍या 32 महिन्‍यांचा कालावधी पुर्ण केला. त्‍यांचे जागेवर सातारा ग्रामीण येथुन गणेश किंद्रे (ganesh kindre) हे वणी उपविभागाची जबाबदारी सांभाळणार आहे. गृह विभागाने राज्‍यातील 119 उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना केल्‍या आहेत.The Home Department has posted 119 sub-divisional police officers in the state.

c1_20230523_11524890
गणेश किंद्रे वणीचे नवे SDPO

वणी उप विभागात पाच पोलीस स्‍टेशन येतात त्‍यासर्व ठिकाणी उप विभागीय पोलीस अधिकाऱ्याला विशेष लक्ष ठेवावे लागते. कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी याकरीता दक्ष असावे लागते. उप विभागातील वणी,  मारेगांव, शिरपुर, मुकुटबन व पाटन असे पाच पोलीस स्‍टेशन आहेत.

वणी उप विभाग हा औदयोगीकदृष्‍टया सक्षम असल्‍याने आणि परप्रांतीय कामगारांचा मोठया प्रमाणात भरणा असल्‍यामुळे पोलीस प्रशासनाला सदैव तत्‍पर असावे लागते. उप विभागात मागील काही वर्षापासुन अवैद्य व्‍यवसायावर आळा बसविण्‍यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. कोळसाचोरी,  भंगारचोरी, कोंबड बाजार,  गोवंश तस्‍करी, गुठखा तस्‍करी तसेच मटका व जुगार बोकाळणार नाही यांची काळजी पोलीस प्रशासनाला घ्‍यावी लागणार आहे.

संजय पुजलवार यांनी अडीच वर्षाचा आपला कार्यकाळ पुर्ण केला आहे. त्‍यांची पोलीस उप अधिक्षक म्‍हणुन यवतमाळ मुख्‍यालयात बदलीने पदस्थापना करण्‍यात आली आहे. त्‍यांचे जागेवर सातारा ग्रामीण उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावलेले गणेश किंद्रे हे रुजू होणार असुन नविन उप विभागीय अधिकाऱ्याला पाच पोलीस स्‍टेशनचा गाडा हाकतांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
Rokhthok News