● LCB ने चार तासांत केला भंडाफोड !
CRIME NEWS :
गुरे चारण्यावरून वाद झाला, वादाचे रूपांतर मारहाणीत. चक्क कुऱ्हाडीने वार करत 21 वर्षीय तरुणांची हत्या करण्यात आली. मृतदेह जंगलात दगडाखाली लपविण्यात आला. 8 जुलैला मृतदेह मिळताच पोलिसांनी तपासाची गती वाढवली. अवघ्या चार तासात हत्येचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश मिळाले असून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. Body hidden under a stone in the forest, LCB arrested the accused within four hours
शेख अल्ताफ शेख इरफान ऊर्फ अप्पू (35), शेख वसिम शेख इरफान (24) व शेख अफताफ शेख अल्ताफ (19) ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे. जनावरे चरण्याच्या वादातून त्यांनी शेख अयाज शेख हारुन (21) रा. खंडाळा या युवकाची कु-हाडीने निर्घृण हत्या केली व मृतदेह जंगलात दगडाखाली लपविण्यात आला होता.
मृतदेह सापडल्यानंतर अयाजचे वडील शेख हारुन शेख हुसेन यांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे जंगलात लपून बसलेल्या अवस्थेत तिघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली.
ही दणदणीत कारवाई PI सतीश चवरे, API धीरज बांडे, PSI शरद लोहकरे, पोहवा मुन्ना आडे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, पोशि सुनील पंडागळे आणि राजेश जाधव यांच्या संयुक्त पथकाने केली.
ROKHTHOK NEWS






