Home क्राईम वादाचे रूपांतर मारहाणीत, महिला गंभीर जखमी

वादाचे रूपांतर मारहाणीत, महिला गंभीर जखमी

● पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

C1 20260117
IMG 20260522 WA0013

पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Crime News : तालुक्यातील राजूर कॉलरी येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना गुरुवारी 15 जानेवारीला सायंकाळी घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या डाव्या हाताला जबर मार लागला आहे. Argument turns into assault, woman seriously injured

पीडित महिला राजूर कॉलरी, येथे वास्तव्यास असून रोजमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह कृष्णा बजरंग दहे रा. लालपुलीया, वणी याच्याशी झाला होता. पतीकडून सातत्याने वाद व मारहाण होत असल्याने पीडिता काही दिवसांपासून त्याच्यापासून वेगळी राहत होती.

IMG 20260511 WA0005

घटनेच्या दिवशी दुपारी आरोपी पीडितेच्या घरी आला व धमकी देत तिचा मोबाईल फोडून निघून गेला. त्यानंतर घटनेची माहिती देण्यासाठी पीडिता सायंकाळी आरोपीच्या मावशीकडे गेली असता, तेथेच आरोपीने तिच्याशी टोकाचा वाद घालत लोखंडी रॉडने डोक्यावर व डाव्या हातावर जोरदार मारहाण केली.

Img 20250103 Wa0009

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला ग्रामीण रुग्णालय, येथे दाखल केले. वैद्यकीय तपासणीत डाव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध बीएनएसच्या कलम 118(2), 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Rokhthok

Previous articleभीषण धडक, दुचाकीस्वार ठार
Next articleकोंबड बाजारावर धाड, 6 जुगारी अटकेत
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.